माझी कविता...
" कळलेच नाही " मन माझे तुझे झाले अन् कधी तुझे मन माझे कळलेच नाही. प्राण एकमेकांचे, आता एकमेकांचे उरलेच नाही. क्षणोक्षणी तुझाच ध्यास अन् तुला लागली माझी आस ह्या जगण्यातील गुज कुणा कळलेच नाही. माझा नाममात्र श्वास पण चोहीकडे तुझाच भास आभास हा की सत्य कधी उमगलेच नाही. माझ्या अंतरंगी तू अन् तुझ्या अंतरंगी मी कधी एकरंग एकरूप झालो समजलेच नाही. खोलवर डोळ्यात तुझ्या प्रतिबिंब आपल्या भविष्याचे वेदनांची कधी झाली फुले अन् अश्रूंचे मोती कळलेच नाही. आता जगणे झाले गाणे अन् आयुष्य हे तराने शिळ प्रितीची घालतांना श्वास कधी थकलेच नाही श्वास कधी थकलेच नाही. ©️ डॉ. राजेंद्र कमानकर१०/०३/२०२२ (लग्नाचा १४ वा वाढदिवस)
|
Comments
Post a Comment